loader image
[ays_poll id=7]

महामार्ग नव्हे, हा आहे आर्थिक समृद्धीचा महामार्ग – ही आहेत समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

Dec 11, 2022

महाराष्ट्रासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग चा पहिला टप्पा आज (11 डिसेंबर) पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून खुला करण्यात आला आहे. मुंबई-नागपूर असा हा एक्सप्रेस वे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी बनला आहे. त्यामुळेच बहुप्रतिक्षित या महामार्गाकडे अनेकांचे लक्ष लागुन होते. हा महामार्ग केवळ महाराष्ट्राच्या आर्थिक आणि उपराजधानीला जोडणारा महामार्ग नव्हे तर महाराष्ट्रातील 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार असल्याने खास बनला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ची नेमकी खास वैशिष्ट्यं काय आहेत हेही जाणुन घेऊ या

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात लांबीचा एक्सप्रेस वे आहे. हा महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, नाशिक शहरांचा समावेश आहे. एक्सप्रेस वे च्या आजपास असणार्‍या 14 अन्य जिल्ह्यांना देखील यामुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे विदर्भ, मराठावाडा आणि उत्तर महाराष्ट्रच्या 24 अन्य जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
पर्यटन हे क्षेत्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठी भूमिका बजावत असल्याने समृद्धी महामार्ग देखील दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजंठा एलोरा गुंफा, शिर्डी, वेरूळ, लोणार तलाव या राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांजवळून जात आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांना देखील चालना मिळणार असल्याचा अंदाज आहे.
सध्या समृद्धी महामार्गाचा सध्या एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पण मुंबई-नागपूर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर यावर 120 मीटर लांबीच्या 8 लेन्स असणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूकीच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या 8 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे. तर पहिल्या टप्प्यात सुरू झालेला नागपूर-शिर्डी हा प्रवास 10 ऐवजी आता अवघ्या 5 तासामध्ये होणार आहे.
समृद्धी महामार्ग वर 40-50 किमी च्या अंतरावर इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग व्यवस्था असणार आहे. हायवे वर ट्राफिक मॅनेजमेंट साठी इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम असणार आहे.
समृद्धी महामार्ग हा देशातील हायटेक हायवे देखील आहे. इंटरचेंज जवळ 35-40 हेक्टर जमीनीवर सोलर पॉवर प्रोजेक्ट देखील आहे. यामधून 161 मेगावॉट वीजनिर्मिती देखील होणार आहे.
समृद्धी महामार्गावर 150km/h कमाल मर्यादा असणार आहे. त्यानुसार डिझाईन करण्यात आलेले आहे. 8 जणांची आसनव्यवस्था असलेल्या वाहनांमध्ये बिन घाटाच्या भागात 120km/h तर घाट परिसरात 100km/h स्पीड लिमिट असणार आहे.
701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.