loader image
[ays_poll id=7]

प्रा.नितीन लालसरे यांना समाज भुषण पुरस्कार प्रदान

Dec 17, 2022

मनमाड 🙁 योगेश म्हस्के )मनमाड शहराचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितीन लालसरे यांना आदिवासी विचार मंच संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षीचा समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आदिवासी विचार मंच , अहमदनगर , महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजातील गरजवंतांच्या मदतीसाठी धावणाऱ्या आणि समाजसेवा करणाऱ्या समाजसेवक आणि अशा मान्यवर व्यक्तींचा संस्थेच्या वतीने समाजभुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो , यंदाच्या वर्षी प्रशासकीय सेवेत राहुन समाजातील प्रत्येक नागरिकांना नेहेमी मदत करत असणारे आणि आपल्या कामातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास संपादन करून त्यांचे विश्वासु अधिकारी म्हणुन प्रशासनात परिचित असणारे प्रा.श्री नितिन लालसरे यांना समाजभुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुधीर दरेकर , उपाध्यक्ष दिलीप सोनवणे , राहुल शिंदे ,भाऊसाहेब कुदळ , प्रमोद सोनवणे आदी पदाधिकारी यांच्या हस्ते प्रा.श्री नितीन लालसरे यांचा समाजभूषण पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

समाजभुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रा.श्री नितिन लालसरे यांचे समाजातील सर्व स्थरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.