loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेला अपूर्व उत्साहात साजरा

Dec 19, 2022


मनमाड : ( योगेश म्हस्के )श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड मध्ये गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने सालाना जोडमेला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यंदाच्या वर्षीच्या श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या 356 व्या पावन प्रकाश पूरब निमित्ताने दि.16,17 आणि 18 डिसेंबर रोजी गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी भजन,कीर्तन,लंगर आदी धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले , तीन दिवस कथा आणि किर्तन सादर करण्यात आले. सालाना जोडमेला निमित्ताने गुरुद्वाराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असुन या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव , मान्यवर आणि कलाकार सहभागी झाले होते.

गुरुद्वारा पासुन संपुर्ण मनमाड शहरामध्ये सालाना जोडमेला निमित्ताने भव्य स्वरूपात नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये तलवारीबाजी आणि यासारखे साहसी खेळ खेळणारे पथक , पंजाबी बँड , ढोल-ताशा , नगारा , हलकी आदी पथकांसह पवित्र पंचप्यारे आकर्षक सजावट केलेला रथ सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी या मिरवणुकीमध्ये सर्वांचे आकर्षण म्हणजे आकाशातुन मिरवणुकवर पुष्यवृष्टी करणारे हेलिकॉप्टर होते.

याप्रसंगी देशातील अनेक भागातुन शीख बांधव आणि शहरातील सर्व धर्मिय नागरिक आणि भाविक या उत्सवात सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
.