loader image
[ays_poll id=7]

नागापूर ग्रामपंचायत निवडणूक : पवार की सोमासे – आज होणार फैसला

Dec 20, 2022

नागापूर ग्रामपंचायतीची अटीतअटीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. थेट सरपंच पदासाठी चुरस दिसून आली.

नागापूर ग्रामपंचायतीत एकूण २००९ पैकी १८३० मतदारानी आपला हक्क बजावला, यामध्ये पुरुष ९७१, तर ८७९ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९१ टक्के इतके मतदान झाल्याने उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

सदस्यपदासाठी नाट्यमय घडामोडीच्या माघारीनंतर तीन सदस्य बिनविरोध निवडून आले असून थेट सरपंच पदासाठी तीन उमेदवारांनमध्ये काटे की टक्कर होत आहे , माजी आमदार संजय पवार यांच्या बाजूने माजी सरपंच अशोक पवार उमेदवार असून, त्यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार उमेदवार असून, रघुनाथ सोमासे तिसरे उमेदवार आहेत.

प्रभाग एकमध्ये अनुसूचित जाती राखीव जागेसाठी विजय नगे, रवींद्र नगे यांच्यात,सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी कावेरी पवार, केशरबाई पवार, कांचन पवार यांच्यात, प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण जागेसाठी प्रकाश जिरे, निलेश पवार, शोभाबाई पवार यांच्यात,प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी विद्या देवरे, मंगल नगे यांच्यात सरळ लढत,तर सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी रंजना पवार, स्नेहल पवार यांच्यात सरळ सामना होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.