loader image
[ays_poll id=7]

पुण्यातील भिडेवाड्यात लवकरच भरणार मुलींची शाळा

Dec 22, 2022


पुणे शहरातील भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनातील बैठकीत केल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉर फुटिंगवर तत्काळ काम सुरू करून ते काम मार्गी लावण्याचे आदेश मनपा आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने मुलींची पहिली शाळा दि. १ जाने १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरु केली होती. मुलींसाठी शाळा सुरू झाल्याने स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले गेले. त्याच सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेची आज अक्षरक्ष: दुरवस्था झाली आहे.वाड्याच्या जागेच प्रकरण न्यायालयात गेलं आणि खटला वर्षानुवर्षे सुरु राहिला आता मात्र हा वाद कोठेतरी संपून या स्मारकाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून गेली जात होती.

 

भिडे वाड्याच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे,अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, अप्पर मुख्य सचिव नगरविकास, अप्पर मुख्य सचिव वित्त,प्रधान सचिव पर्यटन, प्रधान सचिव संस्कृतिक कार्य,मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी , पुणे मनपा आयुक्त आणि गाळेधारक व्हिडिओ कॉन्फर्सिंग द्वारे उपस्थित होते.

 

पुणे येथील भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी काल दिवसभर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते भिडेवाड्याच्या समोर उपोषणाला बसले होते. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महानगरपालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेवून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने दि. २१ फेब्रुवारी २००६ रोजी ठराव क्र. ५५७ अन्वये ठराव मंजूर केला होता. भिडेवाडयात पुणे महानगरपालिकेच्या वतीने “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करण्याचा दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शासनाने निर्णय घेतला होता. महानगरपालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनातील बैठकीत केल्या.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.