loader image
[ays_poll id=7]

नागरकोईल तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या सात खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

Dec 23, 2022

युथ ज्युनिअर व सिनियर गटाच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पोंजेसली कॉलेज नागरकोईल तामिळनाडू येथे 28 डिसेंबर ते 7 जानेवारी 2023 दरम्यान करण्यात आले आहे भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्याने चुरशीची स्पर्धा होणार असून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी व भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी या राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंची निवड केली जाणार आहे.राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड झालेले मुकुंद, वीणाताई, मेघा ही तीन सख्खी भावंड आहेत महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.तसेच पूजा व साइराज ही दोघंही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली सख्खी भावंड आहेत.
आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरू गोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर व्यवहारे,आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची वीणाताई संतोष आहेर,संध्या भास्कर सरोदे, के आर टी विद्यालयाचा साइराज राजेश परदेशी,छत्रे विद्यालयाची मेघा संतोष आहेर,राष्ट्रीय खेळाडू पूजा राजेश परदेशी यांची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे.
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे संदीप,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस के आर टी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे श्री गुरू गोविंद सिंग हायस्कुलचे प्राचार्य सदाशिव सुतार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
.