loader image
[ays_poll id=7]

के आर टी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला सुरुवात

Dec 23, 2022


कवि रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या हिवाळी क्रिडा महोत्सव 2022 चे उद्घाटन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कु. तृप्ती पाराशर यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात दिमाखदार पध्दतीने पार पडले. 22 ते 24 डिसेंबर या कालावधीत पार पडणा-या 3 दिवसीय क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी शाळेच्यावतीने प्राचार्य श्री. मुकेश मिसर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, धनंजय निंभोरकर व संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या कु. तृप्ती पाराशर यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुस्तक देवून प्राचार्य श्री. मुकेश मिसर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी व श्री. धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय सौ. संगिता कदम-देसले यांनी करून दिला.
कार्यक्रमाची सुरूवात मागील वर्षाच्या हेडबॉय-हेडगर्ल तसेच चारही गटाचे गटप्रमुख यांच्या दमदार संचलनाने झाली. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या हेडबॉय-हेडगर्ल व गटप्रमुखांचा शपथविधी व आधिकारग्रहण समारंभ पार पडला व नवनिर्वाचित हेडबॉय आदित्य राजेश सोनवणे व हेडगर्ल कु. भक्ती तुषार चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडाक्षेत्रात तालुका ते राज्यस्तरीय पातळीवर कामगिरी करणान्या खेडाळूंनी मशाल दौड पूर्ण करून मशाल प्रमुख पाहुण्या कु. तृप्ती पाराशर यांच्याकडे सोपवली त्यांनी मुख्य मशाल प्रज्वलीत करून क्रिडामहोत्सवाचे, नारळ वाढवून व क्लॅपर वाजवून मैदानी खेळाचे उद्घाटनही केले.
आपल्या मनोगतात कु. तृप्ती पाराशर यांनी आपण आयुष्यात एक ध्येय निश्चित केल्यानंतर ते मिळविण्यासाठी अनंत अडचणी आल्या तरी आपला निर्धार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण ध्येय प्राप्त करू शकतो. उच्च ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कठोर मेहनत केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. असे प्रतिपादन केले. स्वप्न उंच ठेवा आणि दृढनिश्चयाने न घाबरता प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही ध्येय गाठालच. असा विश्वास त्यांनी विदयार्थ्यांना दिला तसेच शाळेमध्ये अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने राबविल्या जाणा-या क्रिडामहोत्सवाविषयी प्रमुख पाहुण्यांनी गौरवोद्गार काढले.

या प्रसंगी तालुका पातळीपासून राज्यपातळीपर्यंत दैदिप्यमान कामगिरी करणा-या सर्व खेळाडूंचा तसेच विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. श्रावणी अमर चव्हाण या विदयार्थिनीचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. सौ. संगिता कदम, क्रीडाशिक्षक श्री. विशाल झाल्टे आणि सौ. अंजली लहाने यांचाही भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
या तीन दिवसीय क्रिडामहोत्सवाचे काटेकोर नियोजन व विविध स्पर्धांचे आयोजन सर्व शिक्षक तसेच क्रिडाशिक्षक विशाल झाल्टे व क्रिडाशिक्षिका अंजली लहाने यांच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे. तसेच मागील 1 महिन्यापासून विदयार्थ्यांना गटनिहाय मैदानी खेळांचा सरावाची संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे 4 ही गटात विविध स्पर्धा प्रकारात बाजी मारून गटसम्राट चे मानचिन्ह जिंकण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे.

हेडबॉय, हेडगर्ल व चारही गटप्रमुखांच्या शपथविधी व आधिकारग्रहण समारंभाचे संचलन शाळेच्या शिक्षिका सौ. रूपाली निंभोरकर यांनी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. श्रावणी अमर चव्हाण या विदयार्थिंनींने केले.
शाळा व संस्थेच्यावतीने प्रमुख पाहुणे कु. तृप्ती पाराशर यांचा सत्कार श्री. मुकेश मिसर, श्री. दिपक व्यवहारे, श्री. वैभव कुलकर्णी व श्री. धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते शाल, पुस्तक व सन्मानचिन्ह देवून करण्यात आला. आभार प्रदर्शन हेडबॉय आदित्य राजेश सोनवणे याने केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. मनोज छाबडा, किशोर माळी, तुषार चौधरी, श्री. गणेश लहाने, डॉ. प्रदीप साळी यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
.