मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “विशेष श्रमसंस्कार शिबिराचे” उद्घाटन कातरणी ता. येवला येथे पार पडले. माविप्र येवला तालुका संचालक
मा. श्री नंदकुमार बालाजी बनकर यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य मा.श्री मोहन शेलार हे होते. या उद्घाटन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.श्री बाळासाहेब साळुंखे, हे उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले व शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरपंच सौ सरलाताई अंबादास सोनवणे, उपसरपंच श्री मोहन मधुकर कदम, श्री. एल. जी. कदम सर, चेअरमन आप्पासाहेब सोनवणे, विजय कुऱ्हाडे, अंबादास सोनावणे इ. मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पार पडले .या २४ ते ३० डिसेंबर २०२२ या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिरात “आजादी का अमृतमहोत्सव” निमित्त ठरविण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने कार्य केले जाणार आहे .
महाविद्यालयाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ डी.डी.गव्हाणे यांनी केले. रा.से.योजनेचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. भाबड एन व्ही. यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ए बी जाधव यांनी केले तर आभार प्रा. आर. जे. बहोत यांनी मानले.
मा.नंदकुमार बनकर यांनी शिबिरासाठी निवडलेल्या गावाची सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीवर चर्चा केली व महाविद्यालयाने सुयोग्य गावाची निवड केल्याबद्दल अभिनंदन केले. मा. मोहन शेलार यांनी ते विद्यार्थीदशेत असल्यापासून NSS मध्ये होते व आज ते राजकारणात सक्रिय असण्यामध्ये या एनएसएस चे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले व त्यांच्या सहकार्याने अधिकारी आपल्या भेटीला या उपक्रमाची सुरुवात करण्याचेही त्यांनी नमूद केले.
मा. बाळासाहेब साळुंखे यांनी सामाजिक प्रश्नाची उकल करत असतानाच नोकरीच्या संधी कमी होत असल्याने युवकांनी जिद्द व चिकटीसह व्यवसायात उतरावे असे नमूद केले. या शिबिरासाठी 50 स्वयंसेवक सहभागी झालेले असून या कार्यक्रमासाठी प्रा. कर्डिले मॅडम, प्रा. ए. नवले, प्रा. जी.सी.बर्वे, प्रा. डी.एस.पाटील, प्रा. सर्जेराव बोरसे, श्री. तिले सर, गवळी सर, ठोके मॅडम, सर्व प्राध्यापक व सेवक वृंद उपस्थित होते.