loader image
[ays_poll id=7]

गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर सक्त कारवाई करण्याची सह्याद्री प्रतिष्ठानची मागणी

Dec 26, 2022


मनमाड – दिनांक ३१ डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर मद्यपान, नशापाणी, मांसाहारी पार्ट्या करून गडकिल्ले व परिसरातील वास्तु, स्मारके यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यात यावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागातर्फे नितीन शेळके यांनी मनमाड पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले.
महाराष्ट्रातील तमाम गडकिल्ले हे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील बलस्थाने असून यासाठी अनेक मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे. ह्या किल्ल्यांवर अनेक समाध्या आणि देवी देवतांची मंदिरे असल्याने आम्ही हिंदुस्थानातील शिवभक्त गडप्रेमी त्यांना पवित्र तीर्थस्थाने मानतो. दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी पाश्चिमात्यिक संस्कृतीचे अनुकरण करणारे काही ठराविक लोक, समूह ह्या किल्ल्यांवर मद्यपान पार्ट्या करून धिंगाणा घालण्याचे दुष्कर्म करत असतात. यामुळे तेथील पावित्र्य भंग होते. आणि बऱ्याच प्रमाणात कचराही जमा होतो. त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी ३१ डिसेंबर रोजी आपल्या जवळील किल्ल्यांवर पोलिसांची गस्त ठेवावी अशी सह्याद्री प्रतिष्ठान च्या दुर्गसेवकांची मागणी असल्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान चे नाशिक जिल्हा संघटक नितीन शेळके, प्रवीण शेळके तसेच मनमाड पोलिस स्टेशन चे अधिकारी भाऊसाहेब कोते, सुनिल पवार हे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
.