नांदगाव (प्रतिनीधी) मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघाची तालुका बैठक आज जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.. यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून दै.सकाळचे प्रतिनिधी अमोल खरे यांची तर सरचिटणीस म्हणून दैं.पुण्यनगरीचे प्रतिनीधी संदीप जेजूरकर यांची निवड करण्यात आली.
येथील बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तालुका बैठकीत ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, पत्रकारांच्या अनेक संघटना व संघ आहेत, मात्र नांदगाव तालुका त्याला अपवाद असून नांदगाव – मनमाड शहर व ग्रामीण भाग असे एकत्रित असलेला तसेच सर्वच जिल्हा दैनिके, साप्ताहिक, डिजिटल मीडिया व राज्य वृत्तवाहिनीचे प्रतिनीधी असलेला एकसंघ पत्रकार संघ म्हणजे ‘ नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ ‘ होय..गेल्या दीड वर्षात या संघाच्या माध्यमांतून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. मनमाड शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटबांचा गौरव असेल, समुहगायन स्पर्धा असेल किंवा पत्रकारांचा कौटुंबिक सोहळा असेल यामध्ये सर्वच पत्रकार हिरीरीने सहभाग घेत असतात. याचा विशेष आनंद वाटतो.. भविष्यातही अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या संघाच्या माध्यमातून हाती घ्यावयाचे आहे. व जिल्ह्यात व राज्यात नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ एक आदर्शवत पत्रकार संघ राहील असे भरीव काम या संघाच्या माध्यमांतून करावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले. यावेळी आंनद बोथरा, रुपाली केदारे, सचिन गायकवाड, शशी जाधव, किरण भालेकर, राजेंद्र जाधव, अनिस शेख, रोहित शेळके उपस्थित होते.
यावेळी निवडण्यात आलेली नांदगाव तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे –
तालुकाध्यक्ष : अमोल खरे, सरचिटणीस – संदीप जेजुरकर, कोषाध्यक्ष – निलेश वाघ, कार्याध्यक्ष – सुरेश शेळके, संघटक – प्रमित आहेर, उपाध्यक्ष – सोमनाथ घोंगाने, बाबासाहेब बोरसे, सहकार्याध्यक्ष – उपाली परदेशी, सहसरचिटणीस – अशोक बिदरी, संजय मोरे
सहकोषाध्यक्ष – सोमनाथ तळेकर, गणेश केदारे
सहसंघटक – तुषार गोयल, सॅमसन आव्हाड
सल्लागार – नरहरी उंबरे, अनिल आव्हाड, रामदास सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख – नाना आहिरे, प्रज्ञानंद जाधव
फोटोग्राफर समन्वयक : योगेश म्हस्के, चंचल गंगवाल
मार्गदर्शक – भास्कर कदम, अशोक परदेशी, नरेश गुजराथी, मारुती जगधने, जगनराव पाटील, सतिष शेकदार, प्रा. सुरेश नारायने