loader image
[ays_poll id=7]

टाटा मॅजिक जळून खाक; अंकाई जवळील घटना

Dec 30, 2022

मनमाड रेल्वे स्थानकांतून शिर्डीसाठी ७ ते ८ प्रवासी घेऊन टाटा मॅजिक ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी मनमाडकडून शिर्डीकडे भरधाव निघाली होती. मनमाडहुन गाडी निघाली असता मनमाड येवला रस्त्यावर अंकाई फाट्याजवळ रस्त्याने जात असताना गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. गाडीत काही तरी बिघाड झाला असावा किंवा गाडी जास्तच गरम झाली असावी त्यामुळे गाडी पेट घेऊ शकते हे लक्षात आले असतात चालकाने प्रसंगावधान दाखवत अंकाई फाट्याजवळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून उभी करत गाडीत बसलेले सर्व प्रवासी तातडीने उतरवून देऊ त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. चालकाने गाडीखाली उतरून पाहणी करीत असताना इंजिनमध्ये आग लागली. पाहता पाहता गाडीने चांगलाच पेट घेतला होता. गाडी पेटल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी आणि वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गाडी चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली असली तरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे. आगीची तीव्रता एवढी होती की, अवघ्या काही मिनिटांत गाडी पूर्ण जळाली. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात येते. धावत्या गाडीने अचानक कसा पेट घेतला. याचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीची माहिती मिळताच मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेश येथून रेल्वेने मनमाडला आले व मनमाड येथून शिर्डी येथे खाजगी वाहनाने जात असतांना ही दुर्घटना घडली.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.