loader image
[ays_poll id=7]

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात… एच.ए.के.हायस्कूल व गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ उपांत्यफेरीत दाखल

Dec 30, 2022

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय आंतरशालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीताचे गायन करून श्री.गुरूसिंगकांतजी व डॉ.धारवाडकर सर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली.त्यानंतर मुलींची रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली.या वेळी डॉ.शांताराम कातकडे,डॉ.सुनील काजीकर,डॉ.नितीन लोढा,डॉ. नितीन जैन,डॉ.सुनील बिडगर, डॉ.रवींद्र राजपूत, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल,मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,सदाशिव सुतार सर,मुकेश मिसर सर,विकास कराड सर,प्रभाकर सुर्यवंशी सर,राजेश निकुंभ सर,सहभागी शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक,आकांक्षा आव्हाड मॅडम,मनोहर सूर्यवंशी सर,सादिक पठाण,साईनाथ गिडगे, पत्रकार राजेंद्र धिंगाण,आमीन नवाब शेख,आझाद आव्हाड,फुले शाहू मुस्लिम विचारमंच मनमाडचे कार्याध्यक्ष फिरोज शेख,कादिर शेख,दत्ताभाऊ झालटे,सनी फसाटे,पवन रॉय ,अशोक पाईक, सचिन राऊत,सनी अरोरा,मटरु चुनियान,मन्सूफ शाह,इम्रान शाह,वाल्मिक बागुल, अमित कांबळे,राजेश चावरीया,सागर शेळके,श्याम खलसे, अतुल साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे एम.पी.क्रिकेट अध्यक्ष राजाभाऊ जाधव व मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर,सचिव जाविद सर,कार्यवाहक देवेंद्र चुनियान,सदस्य आकाश चुनियान यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आले.तसेच मनमाड गुरुद्वारा तर्फे सहभागी संघाचे सर्व विद्यार्थी व क्रीडाशिक्षक यांना नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.*
आज झालेल्या सामन्यात एच.ए.के.हायस्कूल व गुड शेफर्ड हायस्कूल या दोन्ही क्रिकेट संघाने उपांत्यफेरीच्या सामन्यात प्रवेश केला.पंचाचे काम रहीम पठाण,परेश (छोटू) राऊत,खलील कुरेशी,प्रेम शाह,मनवीर सोनवणे यांनी पाहिले.ऑनलाईन स्कोरर चे काम ओंकार ठोंबरे,सिद्धार्थ (भोला) रोकडे यांनी पाहिले.तसेच भाटगाव चे ग्रामपंचायत सदस्य अशोक गवळी,कळवाडी चे प्रदीप देसले सर,मनोज ठोंबरे सर,सिद्धार्थ (भोला) रोकडे,यांनी उत्कृष्ट समालोचन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

अजून बातम्या वाचा..

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.