loader image

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

Dec 30, 2022


मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ कातरणी ता. येवला येथे पार पडले. 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी समारोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र चे नांदगाव तालुका संचालक मा.श्री. इंजि. अमित भाऊ बोरसे पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. रमेश अण्णा बोरसे हे होते. व्यासपीठावर मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी डी गव्हाणे, मा.सौ सरलाताई अंबादास सोनवणे (सरपंच कातरणी) मा श्री मोहन मधुकर कदम (उपसरपंच ) माननीय श्री विजय वाल्मीक कुऱ्हाडे सामाजिक कार्यकर्ता, सदस्य श्री. लोहकरे इत्यादी मान्यवर उपस्थितीत
होते.
कार्यक्रमाचे सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना गीत व सामूह गीताने झाली. या सात दिवशीय दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे अहवाल वाचन प्रा.भाबड एन व्ही (राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी) यांनी सादर केला . प्रसंगी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे यांनी केले. .मविप्र संचालक अमित भाऊ बोरसे यांनी आपले मनोगत मांडताना विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व, श्रमाचे महत्त्व त्याचबरोबर विविध सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले व त्याचबरोबर समाजाचे मन जाणून घेण्याचे रा.से.यो. हे एक माध्यम आहे. त्यामुळे ग्रामीण समाजापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेता येतात. तसेच गावात केलेली स्वच्छता, सर्वेक्षण, जन जागृती, जलसंधारण, वैचारिक प्रबोधन इ. कामाची पाहणी केली व विशेष कौतुक देखील केले. शिबिर काळात काम केलेल्या स्वयंसेवकांना व कार्यक्रम अधिकारी यांना गौरविण्यात आले. कातरणी गावाच्या ग्रामसेविका श्रीमती सुरेखा आहेर यांनी स्वयंसेवकांना आपल्या भाषणातून प्रोत्साहन दिले. आपले मनोगत व्यक्त केले स्वयंसेवकांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना बक्षीस वितरित करण्यात आले अनेक सहभागी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाचे मनोगत मांडले
या कार्यक्रमात सुमारे 50 विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झालेले होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती ए एस करडेल मॅडम तसेच प्रा. पी पी भूरूक मॅडम यांनी अविरत प्रयत्न अशा प्रकारचे केले त्याचबरोबर महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी राजू सांगळे व नवनाथ सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे सर्व व्यवस्थापनाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले.या कार्यक्रमासाठी प्रा ए पी नवले, प्रा. जी.सी बर्वे, प्रा. आर. एम.मत्सगर प्रा. गवळी, श्री. वाय बी टिळे, श्री. एन एस शेळके श्री तेजस थोरमिशे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. ए.बी. जाधव यांनी केले तर सर्व विशेष पाहुण्यांचे आभार प्रा आर जे बहोत सर यांनी प्रकट केले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितांनी गोड जेवणाचा आस्वाद घेतला.


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.