loader image
[ays_poll id=7]

आदर्श इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

Dec 31, 2022

मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व अध्यक्ष म्हणून नांदगाव तालुक्याचे संचालक मा. श्री अमितभाऊ बोरसे -पाटील व श्री रमेश आण्णा बोरसे पाटील उपस्थित होते. त्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मढे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला कॉलेज चे प्राचार्य डॉ. श्री. गव्हाणे सर व अभिनव चे मुख्याध्यापक श्री. वाघ सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती पुनम मढे मॅडम यांनी केले.याप्रसंगी त्यांनी डिजिटल युगामध्ये खेळला किती महत्व आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

अध्यक्षीय भाषणात श्री. अमितभाऊ बोरसे यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम व खेळाचे महत्व समजावून सांगितले. खेळा मुळे आपला किती विकास होतो क्रीडा शालेय जीवनात किती महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध योगा प्रात्यक्षिक , कवायती, नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल श्रीमती. निश्चित मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.