loader image

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

Dec 31, 2022

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय आंतरशालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ विरुद्ध एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघामध्ये झाला.हा सामना गुडशेफर्ड हायस्कूल संघाने जिंकून प्रथम पारितोषिक पटकाविला.उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सेंट झेवियर्स हायस्कूल क्रिकेट संघ,चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूल यांना देण्यात आले.तसेच स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार अंशुमान सरोदे, उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार आयुष व्यवहारे, उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार ओम उगले,उत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कार ओम दिंडे यांना देण्यात आले.
मा.आमदार जगन्नाथजी धात्रक,मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, मा.नगरसेवक सादीकभाई पठाण, पत्रकार आमीन नवाब शेख, पत्रकार अमोलभाऊ खरे, पत्रकार निलेश वाघ, इरफानभाई मोमीन,इरफान भाई,हबिबभाई शेख,मजीद (दादा) शेख, मा.नगराध्यक्ष साईनाथभाऊ गिडगे,पत्रकार राजेंद्रभाऊ धिंगाण,पत्रकार अझहर शेख,फुले,शाहू,आंबेडकरमुस्लिम विचार मंच मनमाड कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख,पदमर साहेब, सनी फसाटे, समाजसेवक अल्ताफभाई शाह,मुश्ताक तांबोळी,आनंद बोथरा,राजाभाऊ आहेर,गुड शेफर्ड मुख्याध्यापक नायडू सर,डॉ.सुहास जाधव,एकनाथभाऊ बोडके यांच्या हस्ते सर्व पारितोषिके देण्यात आले.स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना माजी क्रिकेट खेळाडू हबिबभाई शेख,दत्ता भाऊ झालटे यांच्या तर्फे प्रत्येक शाळेचे नाव प्रिंट करून जर्सी सिल्याबद्दल व सनी भाऊ फसाटे, यांच्या तर्फे प्रथम,द्वितीय,तृतीय,चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफी, वैभव कापडे यांच्या तर्फे इतर सन्मानचिन्ह,मनोहर सूर्यवंशी सर यांच्या तर्फे स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे,मजिद भाई शेख व रितेशभाऊ बन्सल यांच्या तर्फे सर्व सामन्याकरिता टेनिस बॉल ,स्पर्धेत दोन दिवस खेळाडूंना पाण्याचे जार उपलब्ध केल्याबद्दल,राजाभाऊ जाधव यांच्या तर्फे स्पर्धेचे सर्व डिजिटल बॅनर उपलब्ध केल्याबद्दल व सनी भाऊ अरोरा यांच्या तर्फे मंडप स्टेज करून दिल्याबद्दल,साईनाथभाऊ गिडगे यांच्या तर्फे डी.जे. ची सोय केल्याबद्दल तसेच मनमाड गुरुद्वारा प्रबंधक मा.बाबाजी रणजितसिंगजी यांच्या तर्फे सर्व सहभागी खेळाडू, क्रीडाशिक्षक,आयोजक यांच्यासाठी चहा,नाश्ता, व दुपारचे जेवणाची व्यवस्था करून दिल्याबद्दल मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर,सचिव जाविद सर,कार्यवाहक देवेंद्र चुनियान यांनी सर्वांचे आभार मानले.तसेच उपस्थित मान्यवरांचे राजाभाऊ जाधव,सनीभाऊ अरोरा,आकाश देवेंद्र चुनियान यांनी सत्कार केले. स्पर्धेतील सामन्याचे ऑनलाईन स्कोरर ओंकार ठोंबरे,सिद्धार्थ (भोला) रोकडे,पंच खलील कुरेशी,जाकीर शेख,अमित कांबळे यांचे सत्कार करण्यात आले.मनमाड क्रिकेट समितीने विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.