loader image

बघा व्हिडिओ – नाशिक जिल्ह्यातील गोंदे येथे जिंदाल कंपनीत बॉयलर चा स्फोट

Jan 1, 2023


नाशिक जिल्ह्यातील घोटी गावाजवळ जिंदाल कंपनीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये आज 1 जानेवारी 2023 सकाळी बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये आवाज ऐकू आला. कंपनीत साधारण 2000 कर्मचारी कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धुराचे लोटच्या लोट हवेत उसळत असल्याने परिसरात काळोखी पसरली आहे. आगीची तीव्रता भीषण असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर हालवण्यात आले आहे. अधिकचा तपशील अद्याप यायचा आहे.
दरम्यान, आगिचे नेमके कारण समजू शकले नाही. सध्या तरी आगीचे कारण शोधण्यापेक्षा आगिवर नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.