loader image
[ays_poll id=7]

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला – परधाडी फाट्याजवळ छोटा हत्ती व पल्सर च्या अपघातात दुचाकीस्वार ठार

Jan 1, 2023

नांदगाव
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथून नांदगावकडे येत असतांना परधाडी फाट्याजवळ टाटा कंपनीच्या छोटा हत्ती व पल्सर दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार  जागीच ठार झाला. तर दोन गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायडोंगरी येथून टाटा कंपनीच्या एम.एच.०४ जी एफ ४२०७ छोटा हत्ती नांदगावकडे विरुद्ध दिशेने येत असतांंना परधाडी फाट्याजवळ  पल्सर दुचाकी क्रमांक  एम.एच .४१ बी.जे.२१३२ यांच्या झालेल्या अपघातात सोमनाथ रमेश मोरे(२२) रा. पोही ता.नांदगाव हा जागीच ठार झाला असून वसंत लालू मोरे, शास्त्रीनगर,संतोष वाळू फुलमाळी रा.हिसवळ खुर्द,सचिन प्रकाश गोसावी रा.धोटाणे खुर्द ता.नांदगाव हे तिन्ही जखमी झाले आहेत.छोटा हत्ती या गाडीने पल्सर दुचाकीला धडक दिल्याने दोन्ही गाड्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवालदार रवींद्र चौधरी करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.