loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय तर्फे निषेध

Jan 3, 2023

राज्याचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल उच्चारलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी येथील एकात्मता चौकात भारतीय जनता पक्ष, मनमाड मंडल, बाळासाहेबांची शिवसेना पक्ष व आरपीआयतर्फे अजित पवारांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत तीव्र निदर्शने करून निषेध करण्यात आला. ना. अजित पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येथील एकात्मता चौकात वरील तिनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपलांचा हार घालून अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, नितीन परदेशी मनोगत व्यक्त केले. भाजपचे शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, संदीप नरवडे, महाविर ललवाणी, आरपीआयचे दिनकर धिवर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, वाल्मीक आंधळे, आमिन पटेल, अकबर शाह, एकनाथ बोडखे, अनंता भामरे, सुमेध मिसर, बुरहान शेख, दिपक पगारे, अॅड. राजेंद्र पालवे, कांतीलाल लुणावत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.