loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी .

Jan 3, 2023


के आर टी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती .महिला शिक्षण दिन .बालिका दिन. साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी .विश्वस्त धनंजय निंभोरकर. यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. “भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. स्त्री मुक्ती दात्या विद्येची देवता पहिल्या शिक्षिका. मुख्याध्यापिका .कवयित्री .विद्येची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळेस महिला शिक्षण दिन. आणि बालिका दिन साजरा करण्यात आला. “मुलीला नका समजू भार मुलगीच असते संसाराचा खरा आधार” स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .इयत्ता सातवीच्या मुलींनी सिद्धी काजीकर. तन्वी जाधव. दर्शन हिरण या विद्यार्थ्यांनी सवित्रीबाई फुले यांच्या विषयी त्यांचे मत मांडले. इयत्ता दुसरीच्या अन्वी झाडे .स्वरा कोतकर. या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती .”लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदणं लेक रंगांच शिंपण लेक गंध हळवं मन “असं म्हणत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल आव्हाड या विद्यार्थिनीने केले. या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकाद्वीपि .सौ सोनाली सरस्वते यांनी मार्गदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.