loader image
[ays_poll id=7]

नांदगाव-भालुर बससेवा सुरू करावी : युवा सेनेची मागणी

Jan 3, 2023

मनमाड :- दुपारच्या वेळी नांदगाव ते भालूर या मार्गावर बस वाहतूक सुरू करावी अशी मागणी करणारे निवेदन नांदगाव तालुका युवा सेनेतर्फे नांदगाव आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले.

युवा सेना तालुकाप्रमुख सनी फसाटे, नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, आशिष घुगे, पवन पवार, सौरभ निकम, आदेश शिंदे, अविनाश शिंदे, आदित्य आहेर, प्रगती निकम, प्राजक्ता चोळके, पूजा निकम, रोहिणी चोळके, विशाल शेळके, साहिल सोमासे, अविष्कार देवकर, भूषण आहेर, ओमकार मोरे, केतन मोहिते,

अजिंक्य धनगे, प्रवीण निकम, रोशन लाड, सिद्धांत चोळके आदींच्या या निवेदनावर स्वाक्षरी

दुपारी १.४५ मिनिटांची नांदगाव ते भालूर व तीन वाजून ४५ मिनिटांची भालूर मार्गे नांदगाव ते मांडवड ही बस सेवा सुरू होती पण रस्त्याचे काम सुरू असल्याकारणाने सदर सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी सहा व आठ वाजता वाजेची भालूर ते नांदगाव बस नियमित सुरू झालेली आहे. मात्र दुपारची नांदगाव ते भालूसाठी एकही बस अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नांदगाव ते भालूर मार्गावरील महाविद्यालय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे ६०% विद्यार्थी कॉलेज आणि शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याबाबत विद्याथ्र्यांनी प्रशासनाला निवेदन दिलेले आहे. मात्र परिवहन विभागाकडून दखल घेण्यात आलेली नाही. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी निवेदनाची दखल घेऊन बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
.