loader image
[ays_poll id=7]

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील असुविधांबाबत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांचे अहवाल सादर करण्याचे आदेश

Jan 4, 2023


मनमाड शहरातील अन्न महामंडळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी पाहणी केली.त्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली असता तेथे मिळणाऱ्या असुविधा पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वार्डात जाऊन पाहणी केली. रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयायासाठी असलेली १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रसूती विभागात जाऊन पाहणी केली असता तेथील असुविधांबाबत असमाधान व्यक्त केले. अस्वच्छता असल्याने रुग्णांना किती त्रास होत असेल याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रुगांना जेवण भेट नाही, एक्सरे मशीन बंद असल्याचे निदर्शनास आले. खराब बेड, बेडशीट नसल्याचे दिसून आले. याबाबत उपस्थित डॉक्टर अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन करून संबंधीताकडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे शहराध्यक्ष जय फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, संदीप नरवडे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.