loader image
[ays_poll id=7]

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Jan 5, 2023

मनमाड 🙁 योगेश म्हस्के )थोर समाज सुधारिका , स्त्री शिक्षणाच्या जनक , कवियत्री , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.

मनमाड येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे महिला मंडळाच्या वतीने व्याख्यान व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , याप्रसंगी सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून नवनिर्वाचित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष: श्रीमती नंदा अशोक गायकवाड, उपाध्यक्ष: सौ पद्मावती सोपान जाधव, कार्याध्यक्ष: सौ योगिता मनोज गांगुर्डे, सचिव: सौ लता चंद्रकांत मोकळ, सहसचिव: सौ अनिता संजय सोनवणे, खजिनदार: सौ संगीता महेश दारुंटे, सहखजिनदार: सौ भारती अशोक देवरे, प्रसिद्धी प्रमुख: सौ गीता संजय गवळी, संघटक: सौ वैशाली प्रकाश वानखेडे, या नूतन कार्यकारिणीचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

शिवम कॉम्पुटरच्या संचालिका सौ स्वाती भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आपले विचार प्रकट करून उपस्थित महिला वर्गाला मार्गदर्शन केले. कुमारी प्रेरणा अशोक गायकवाड हिने आपले मनोगत व्यक्त केले ,लहानगी संस्कृती मनोज गांगुर्डे ही सावित्रीबाईंच्या वेशात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सौ.अबोली गायकवाड व राजू रौंदाळे यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.पद्मावती जाधव व नंदिनी सोनवणे यांनी केली,तरआभार प्रदर्शन अध्यक्षा श्रीमती नंदा गायकवाड यांनी केले.यानंतर उपस्थित महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होऊन त्यांना भेट वस्तु देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.