मनमाड -भरधाव जात असलेल्या वाहनाने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी शहरातील रेल्वे पुलाजवळ घडली. चंद्रकांत नितीन कातकडे (रा. कॅम्प, मनमाड) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सकाळी शहरातील रेल्वे ब्रिज जवळ कातकडे हे आपल्या दुचाकी (एमएच ४१ बीके ३६६५) वरून भाजीपाला घेऊन बाजारपेठेत विक्रीसाठी येत असताना त्यांना भरधाव जात असलेल्या वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल
नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या...








