loader image
[ays_poll id=7]

जि.प.शाळा,साकोरा येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धा संपन्न

Jan 6, 2023


जिल्हा परिषद शाळा,साकोरा येथे तालुकास्तरीय अध्यक्ष स्पर्धेचे उदघाटन नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री गणेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सहा.गटविकास अधिकारी श्री संदीप दळवी, नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद चिंचोले, बिटविस्तार अधिकारी सौ.एन.आय साळूंके, श्री किशोर सोनवणे, साकोरा शाळेचे मुख्या.श्री आर.एम.बोरसे,क.भा.पा.विद्यालयाचे मुख्या.सौ.के.व्ही.जगताप,तालुक्यातील सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख,विविध स्पर्धेचे परिक्षक उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तालुक्याचे तहसीलदार श्री डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या हस्ते पार पडला. प्रसंगी महाराष्ट्र टाइम्स चे पत्रकार श्री संदीप देशपांडे, गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद चिंचोले, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती ठोके मॅडम. श्री किशोर सोनवणे, मुख्याध्यापक श्री आर एम बोरसे, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख तसेच या स्पर्धेसाठी लाभलेले सर्व परीक्षक हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काशीम शेख सर यांनी केले.
या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे.
लहान गट-
चित्रकला
संस्कार गणेश साळी-प्रथम
वक्तृत्व-
भक्ती उमाकांत अहिरे-प्रथम
100 मीटर धावणे मुली-
रेणुका प्रभाकर बिन्नर-प्रथम
200 मीटर धावणे मुले-
रितेश गोरख पवार-प्रथम
बुद्धिबळ-
पवन भाऊलाल ठाकरे-प्रथम
स्पेलिंग बी-
आदिल आदेश पवार- प्रथम
वैयक्तिक गायन-
काव्यांजली शरद देशमुख- प्रथम
वैयक्तिक नृत्य-
श्रावणी भीमराव गांगुर्डे- प्रथम
समूह गायन-
जि प शाळा जातेगाव-प्रथम
समूह नृत्य-
जि प शाळा स्टेशन वस्ती- प्रथम
मोठा गट-
चित्रकला
खुशी रवींद्र कवडे- प्रथम
वक्तृत्व-
हर्षदा साहेबराव बेदाडे- प्रथम
200 मीटर धावणे मुली
अश्विनी बाबासाहेब गायकवाड प्रथम
400 मीटर धावणे मुले-
यश शिवाजी मोरे- प्रथम
कबड्डी मुले-
जि प शाळा मोहेगाव प्रथम
कबड्डी मुली-
जि प शाळा नांदूर प्रथम
खोखो मुले
जि प शाळा मोहेगाव प्रथम
खोखो मुली-
जि प शाळा मोहेगाव प्रथम
बुद्धिबळ
कावेरी पोपत कांदे-प्रथम
स्पेलिंग बी
स्वप्निल कवडे प्रथम
वैयक्तिक गायन
साक्षी संतोष अहिरे प्रथम
वैयक्तिक नृत्य
वर्षा भाऊराव वाघ प्रथम
समूह गायन
जिल्हा परिषद शाळा चांदोरे प्रथम
समूह नृत्य
जिल्हा परिषद शाळा परधडी प्रथम
यावेळी स्पर्धेचे प्रास्ताविक श्री प्रमोद चिंचोले यांनी केले.यावेळी गटविकास अधिकारी श्री गणेश चौधरी यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री काशिम शेख यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री नाना सर,साळी सर,श्री हिरे सर,श्रीम.गीते,श्रीम.पाटील,श्रीम.घाटे,श्री राऊत,श्री खोंडे,श्री ऊमेश बोरसे,श्री कोठावदे,श्री ठाकरे व सर्व साधन व्यक्ती,कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

हा आहे रितेश पवार
वडाळकरवस्ती शाळेचा‌ विद्यार्थी
जो 200 मी. धावण्याच्या शर्यतीत ला विजेता.
बीटस्तरीय स्पर्धेत जिन्स पॅन्ट घालून‌ पळणारा..पॅन्ट ढिली असल्याने एका हाताने‌ पॅन्ट धरुन पळत होता, तरीही जिंकला. तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मात्र शिक्षकाने त्याला पॅन्ट घेऊन दिली. आज मात्र वा-याच्या वेगाने पळत पहिला क्रमांक काढला व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.