loader image
[ays_poll id=7]

महावितरणचे मोबाईल ॲप ५० लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड

Jan 6, 2023


मुंबई/नाशिक : दिनांक. ६ जानेवारी २०२३:-
विद्युत ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून बिले भरणे, तक्रारी नोंदविणे आणि वीजचोरीची खबर देणे अशा विविध सुविधा असलेल्या महावितरणच्या मोबाईल ॲपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करण्याची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

ते म्हणाले की, ॲप डाऊनलोड करून ते सतत वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २८ लाखांपेक्षा अधिक असून महावितरणच्या एकूण ग्राहकांचा विचार करता प्रत्येकी दहापैकी एक ग्राहक हे ॲप नियमित वापरत आहेत. ऊर्वरित ग्राहकांकडून ॲपचा वापर कमीअधिक कालावधीने होतो.

ते म्हणाले की, महावितरणच्या ग्राहकांना मोबाईल ॲपचा वापर करून महावितरणच्या अनेक सेवा सहजपणे मोबाईल फोनवरून मिळविता येतात. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, त्यासाठीची कागदपत्रे अपलोड करणे आणि त्यासाठीची फी भरून नवीन कनेक्शन मिळविणे ही सुविधा ॲपमार्फत उपलब्ध आहे. या ॲपवरून ग्राहकांना आपले विजेचे बिल पाहता येते आणि भरताही येते. वीजबिलाची नोटिफिकेशन आणि बिल भरल्याची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होते.

ग्राहकांना वीजेच्या बाबतीत तक्रार नोंदविणे आणि आपल्या तक्रारीवर पुढे काय कारवाई झाली याची माहिती घेणे ॲपमुळे सोपे जाते. वीजचोरीची खबर देण्याचीही सुविधा या ॲपवर उपलब्ध आहे. मोबाईल ॲपवरून ग्राहकांना आपल्या मीटरचे रिडिंग स्वतःच भरता येते. जवळचे महावितरणचे कार्यालय अथवा बिल भरणा केंद्र कोठे आहे आणि तेथे कसे जायचे, याचीही माहिती ॲपवरून मिळते, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महावितरणच्या मोबाईल ॲपवरून विजेचे बिल भरण्यासाठी एप्रिल २०२१ मध्ये १० लाख ९७ हजार व्यवहार झाले होते व त्यावरून १५८ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये व्यवहारांची संख्या १५ लाख ८९ हजार झाली होती व त्या माध्यमातून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली होती. अर्थात या कालावधीत मोबाईल ॲपवरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ४४ टक्क्यांनी वाढली तर भरलेल्या बिलांच्या रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले.

नोव्हेंबर २०२२ या महिन्यात महावितरणच्या घरगुती ग्राहकांनी एकूण २१०४ कोटी रुपयांची बिले विविध माध्यमातून ऑनलाईन भरली होती. त्यापैकी मोबाईल ॲपवरून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली. मोबाईल ॲपचे बिल भरण्याखेरीज अनेक उपयोग ध्यानात घेता त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.