loader image
[ays_poll id=7]

नांदगावचे गवळी आणि कांबळेंची मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी निवड

Jan 7, 2023


वर्धा येथे विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी नांदगाव येथील गझलकार काशिनाथ गवळी आणि रविंद्र कांबळे यांची निवड झाली आहे. संमेलन दि. ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असून तीनही दिवस गझल कट्ट्यावर मुशायरे होणार आहेत. यात पहिल्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला संमेलनाच्या उद्घाटन समारोहानंतर दुपारी २ वाजता गझल कट्ट्याचे उद्घाटन होईल आणि मुशायऱ्यांना सुरुवात होईल. पहिल्या दिवशी साधारणतः पाच-सहा मुशायरे होणार असून यात प्रामुख्याने विदर्भातील गझलकारांचा सहभाग राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवार, दि. ४ फेब्रुवारीला सकाळी ९ ते रात्री ९ या दरम्यान आठ ते दहा मुशायरे होतील. तर समारोपाच्या दिवशी दि. ५ फेब्रुवारीला पुन्हा पाच-सहा मुशायरे होतील. या दोन्ही गझलकारांचे व कवितेसाठी कवयत्री प्रतिभा खैरनार यांची कविता वाचनासाठी निवड झाली आहे .
त्यांचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगांव तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
.