loader image
[ays_poll id=7]

रेल्वे गाड्यांचे थांबे आणि अंडरपासचा प्रश्न कधी सुटणार – नांदगावकर नागरिकांचा सरकारला सवाल

Jan 9, 2023


नांदगाव शहरातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक येत्या काही दिवसात बघावयास मिळू शकतो, कारण ही नागरिकांच्या जीवनाशी निगडित अशा आहे. रेल्वे प्रशासनाने कामायनी,झेलम, कुशीनगर, राजेंद्र नगर, या रेल्वे गाड्यांंचे थांबे पूर्वसूचना न देता रद्द केलेले आहेत व वेळोवेळी नागरिकांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासन केराची टोपली दाखविण्याचा प्रकार करत आहे.या गाड्या पूर्ववत होत नसल्याने रेल्वे प्रवाशांकडून संतापाचा उद्रेक झाला आहे.

कोरोना काळातील दोन वर्षापासून रेल्वे गाड्यांंचे थांबे पूर्ववत करण्यासाठी, तसेच नागरिकांना पादचारी पूल व्हावा. या मागणीसाठी गेल्यावर्षी याच महिन्यात नांदगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. शहरातील सर्व नागरिकांनी,व्यापार्‍यांनी स्वयंमस्फूर्तीने बंद पाळून पाठिंबा दर्शविला होता.

नांदगाव स्थानकावरील कामायनी,झेलम, कुषीनगर, राजेंद्र नगर, या रेल्वे गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने गैरसोय होऊन त्याबाबत तीव्र भावना व्यक्त होत आहेत. रेल्वे प्रशासनाने नांदगाव रेल्वे स्थानकाबाबत दुटप्पी भूमिका घेत शहरावर अन्याय केला. अशी भावना रेल्वे प्रवाशांची झाली आहे. रेल्वे प्रशासनाने काशी व महानगरी एक्स्प्रेस थांबे पूर्ववत करून मलमपट्टी केली आहे. महानगरी व सेवाग्राम एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांमध्ये 15 मिनिटांचे अंतर आहे.

नांदगाव तालुक्यातील नागरिक मुंबई, नाशिक,पुणे, दिल्ली या ठिकाणी जाण्यासाठी त्याचप्रमाणे सैन्य दलात असलेले तालुक्यातील जवानांना आपल्या गावी येण्यासाठी आणि कर्तव्यावर जाण्यासाठी नांदगाव येथे कोणतीही गाडी नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे गाड्याना थांबा द्यावा.

दोन वर्षांपूर्वी आम्ही नांदगावकरांच्या वतीने कोरोना काळानंतरही नांदगाव स्टेशनवर थांबणार्‍या सर्व ट्रेन चे थांबे रद्द झाले. त्याला दोन वर्षे उलटूनही खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नांदगावकरांच्या मागण्यांना न्याय दिलेला नाही.नांदगाव रेल्वे स्थानकावर अप- डाऊन करण्यासाठी ट्रेन उपलब्ध नसल्याने काही नांदगावकरांना शहर सोडून बाहेरगांवी जावे लागले आहे.विद्यार्थी, व्यापारी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे .केंद्र सरकारच्या संदर्भातील अंडरपासच्या चुकीच्या कामाची व भ्रष्टाचाराची चौकशी करून व रेल्वेगेट जवळ रेल्वे पादचारी पूल या महत्वाच्या मागणीकडे ही दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे गाड्यांचे थांबे मिळवण्यासाठी पुन्हा आंदोलने करण्याची वेळ आली आहे.


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.