loader image
[ays_poll id=7]

इंडियन मेडिकल असोसिएशन मनमाड शाखेच्या अध्यक्षपदी डॉ शांताराम कातकडे तर सरचिटणीसपदी डॉ रवींद्र राजपूत यांची निवड

Jan 10, 2023


इंडियन मेडिकल असोसिएशन मनमाड शाखेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल श्रीलीलामध्ये संपन्न झाला. राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे प्रमुख पाहुणे व नांदगाव, येवला, चांदवड, लासलगाव येथीलं इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनमाड यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ. रवींद्र कुटे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांसाठी मार्गदर्शनपर विचार मांडले. डॉक्टरांसाठी असणाऱ्या विविध प्रोफेशनल सिक्युरिटी विविध प्रोफेशनल सिक्युरिटी आणि इतर विविध स्कीम तसेच समाज उपयोगी आरोग्य उपक्रम कसे राबवले जाऊ शकतात, याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. कुटे यांच्याहस्ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ अजय भन्साळी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. भन्साळी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉक्टर शांताराम कातकडे यांच्याकडे हस्तांतरित केली. नवनियुक्त्य सचिव डॉ. रवींद्र राजपूत यांनी आगामी दोन वर्षात अधिक उत्साहाने, अनेकजनहिताचे आरोग्यदायी उपक्रम राब अशी ग्वाही दिली. उपाध्यक्ष डॉ. अरुण जगताप, खजिनदार डॉ. सोनाली पाटील आदींनीही पदभार स्वीकारला. या कार्यक्रमात नाशिक येथील सुप्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ञ डॉ. ललित लवणकर यांचे ‘जन्मजात हृदयाचे आजार याविषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झाले. मुंबई येथून आलेले डॉ. मिलिंद चिल्लाटे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ सोनाली पाटील यांनी केले. डॉ. रवींद्र राजपूत यांनी आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.