loader image
[ays_poll id=7]

माजी आमदार तथा इंटक चे नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

Jan 11, 2023

नाशिक शहरातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निष्ठवान कार्यकर्ते माजी आमदार आणि इंटर्कचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांचे काल उशिरा निधन झाले. ते 75 वर्षाचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. तरीदेखील नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. मात्र तब्येत व्यवस्थित नसल्याने त्यांनी जाण्यास टाळले. दरम्यान काल त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. युवक काँग्रेस पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली. तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवाय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची गोल्फ क्लब मैदानावर छाजेड यांच्या पुढाकारातून सभा झाली होती.
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. नाशिकचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रितीश, हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. दरम्यान आज नाशिकच्या काँग्रेस भवन त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहे.

अजून बातम्या वाचा..

प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने जातेगावला विद्यार्थिनीचा मृत्यू

प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने जातेगावला विद्यार्थिनीचा मृत्यू

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात...

read more
महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या एक-एक कलमाचे रोज वाचन व्हावे : शरद शेजवळ अध्यापकभारतीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या एक-एक कलमाचे रोज वाचन व्हावे : शरद शेजवळ अध्यापकभारतीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

येवला (प्रतिनिधी) भारतीयांचा धर्मग्रंथ भारतीय संविधानाची ओळख,महत्व,हक्क अधिकारा बरोबरच कर्तव्य...

read more
बघा व्हिडिओ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचे  विधानभवनात समारंभपूर्वक अनावरण

बघा व्हिडिओ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचे विधानभवनात समारंभपूर्वक अनावरण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात...

read more
माध्यम क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला सिद्ध आणि सक्षम होण्याची गरज – मुग्धा सराफ यांचे पत्रकार गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन

माध्यम क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला सिद्ध आणि सक्षम होण्याची गरज – मुग्धा सराफ यांचे पत्रकार गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन

मनमाड ता  २३ -  माध्यम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने आज या क्षेत्रामध्ये मोठी...

read more
.