मनमाड : ( योगेश म्हस्के )शहरातील युवा सत्ता मंचच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील महात्मा फुले चौक येथुन महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीला सुरवात करण्यात आली , यावेळी भारतीय विचार साधना फौंडेशन , पुणे येथुन आलेल्या फिरते ग्रंथालय या पुस्तकाच्या गाडीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करून पुस्तके नागरिकांना विक्रीसाठी खुली करण्यात आली. या बाईक रॅली मध्ये महिला आणि तरूण वर्ग फेटे परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते , तसेच गाडी मध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांची वेषभूषा परिधान केलेले बालक सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. शहरातील प्रमुख मार्गाने बाईक रॅली मार्गस्थ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.