loader image
[ays_poll id=7]

गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड येथे लोहड़ी (लोहरी) उत्सव साजरा

Jan 14, 2023


मनमाड : ( योगेश म्हस्के)गुप्तसर साहेब गुरूद्वारा मनमाड येथे लोहड़ी उत्सव मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर 13 जानेवारीला रात्री शहरातील शिख बंधवांच्या उपस्थितित आनंदात साजरा करण्यात आला.

लोहड़ी हा पंजाब प्रांतात साजरा होणारा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे.उत्तर हिंदुस्थानातील शीख आणि हिंदू नागरिक हा उत्सव साजरा करतात. जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाशी संबंधित कथा आणि आख्यायिका पंजाब प्रांतात प्रचलित आहेत.लोहारी हा सूर्याच्या उत्तरायण संक्रमणाशी माघ महिन्यात येणारा उत्सव आहे. हिवाळा ऋतूला निरोप देणे असा या उत्सवाचा हेतू असतो.सामान्यत: मकरसंक्रांत सणाच्या आदल्या दिवशी लोहारी साजरा केला जातो.उत्तर भारतातील दिल्ली , पंजाब, हरियाणा या प्रांतात या दिवशी विशेष सुट्टी दिली जाते.

अग्नीपूजा हा या उत्सवातील महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिवाळा ऋतू असल्याने शेकोटी पेटविणे याला पारंपरिक महत्व मिळाले आहे.गूळ,गजक, उसाचा रस यांचा समावेश या दिवशी खाण्यात आवर्जून समावेश केला जातो.गावाच्या मध्यभागी सूर्यास्ताला संध्याकाळी शेकोटी पेटविली जाते. लोक त्यामध्ये तीळ, गूळ वाहतात. त्याभोवती बसून लोकगीते गातात आणि पारंपरिक नृत्य करतात. शेतातील ताजी मक्याची कणसे भाजून खाणे हा एक विशेष कार्यक्रम असतो. शेतात आलेला लाल मुळा हा सुद्धा या दिवशी जेवणात समाविष्ट केला जातो. मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी, किंवा भाकरी ही या उत्सवाची महत्वाची मेजवानी असते. तीळ घालून केलेला भात या दिवशी जेवणात समाविष्ट असतो. याला त्रिचोली म्हटले जाते.

पंजाब च्या काही प्रांतात लोहारी या देवतेची स्थापना केली जाते. गायीच्या शेणापासून ही मूर्ती तयार करून तिची सजावट केली जाते.लोहारी निमित्त सजलेली पंजाबी महिलासुगीच्या काळातील हाती येणा-या शेतातील पिकाचा आनंद साजरा करणे असे या सणाचे महत्व आहे.सूर्याचे उत्तरायण सुरु होवून दिवस मोठा होत असल्याने सूर्याची पूजा आणि स्तुती ही सुद्धा या उत्सवात केली जाते. दुल्ला भट्टी हा पंजाब प्रांतात एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखला जातो. अकबराच्या काळात हिंदू युवतीना पळवून नेले जात असे. त्या मुलींचे रक्षण करणारा म्हणून दुल्ला भट्टी विशेष प्रसिद्ध आहे आणि त्याला समाजात मानाचे स्थान आहे.त्याने वाचविलेल्या सुंदरी आणि मुन्दरी या दोन युवती पंजाबी लोककथांमधे अजरामर झाल्या आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने लहान मुले आसपास जाऊन लोकगीते म्हणतात त्यात याच्या नावाचा उल्लेख येतो. या लोकगीत गायनाच्या कार्यक्रमानंतर घरोघरी लहान मुलांना खाऊ आणि पैसे दिले जातात.

संत कबीर यांच्या पत्नी लोई यांच्या निमित्ताने हा उत्सव सुरु झाला अशीही एक मान्यता आहे लोई म्हणजे अग्नीतील तेज आणि उर्जा होय. होलिका आणि लोई या दोघी बहिणी असल्याचे काही ठिकाणी मानले जाते. सिंधी समुदायात लोई या नावाने हा सण साजरा केला जातो.

या कार्यक्रमास शहरातील सर्व शिख बांधव , मनमाड गुप्तसर गुरूद्वारचे प्रबंधक बाबा रणजीत सिंह जी , शहरातील आणि बाहेर गावाहुन आलेले भाविक उपस्थित होते , कार्यक्रमा नंतर बाबाजींच्या हस्ते सर्वांना प्रसाद देण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.