मनमाड : मनमाड शहरातून चोरीला गेलेली मोटारसायकल मालेगाव शहरात एका गॅरेजवर दुरुस्तीसाठी लावलेली असल्याची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी सापळा रचून दुचाकीसह संशयितास अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी अली रिझवी रहान अली रिझवी (रा. मालेगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मनमाड शहरातून दोन्ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शहरातील कोर्ट रोड येथून दुचाकी (क्रमांक एमएच ४९ वाय १०२७) तसेच इदगाह वेथून एक दुचाकी (क्रमांक एमएच २० बीएल ७७८७) अशा दोन मोटारसायकल चोरीला गेल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासात चोरीस गेलेली दुचाकी ही मालेगाव शहरात एका गॅरेजवर दुरुस्तीसाठी लावलेली असल्याची माहिती मिळाल्याने मनमाड पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून मोटारसायकल घेण्यासाठी आला असता इसम हसन अली रिझवी रहान अली रिझवी (रा. मालेगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मनमाड शहरातून दोन्ही मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, गणेश नरोटे, भाऊराव कोते, संदीप धुमाळ, राहुल बस्ते यांनी केली आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












