loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

Jan 14, 2023

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आले आहेत.पोलिसांनी तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात तब्बल तीन वेळा धमकीचे कॉल आल्याची बातमी समोर आली आहे. सकाळी ११, साडेअकरा आणि पुन्हा बारा वाजता हे कॉल आले. कॉलमध्ये दाऊदच्या आवाजात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या नागपूरमधील निवासस्थानीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात नेहमीच कार्यकर्त्यांची वर्दळ पाहायला मिळत असते. त्यामुळे या धमकीनंतर पोलिसांनी सतर्क राहत सुरक्षा वाढवली आहे.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.