loader image
[ays_poll id=7]

चांदवड जवळील राहुड घाटात बस ने घेतला अचानक पेट – बस जळून खाक

Jan 18, 2023

नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या चांदवड घाटात बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे, वेळीच चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्याने मोठा अनर्थ टळला.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिकसह जिल्हाभरात सातत्याने आगीच्या घटना समोर येत आहेत. अनेक बसेससह इतर खाजगी वाहनांना आग लागण्याच्या घटना नेहमी घडत आहेत. औरंगाबाद नाक्यावरील मिरची चौफुली वरील भीषण आगीच्या घटनेने राज्याला हादरवून सोडले होते. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या भीषण आगीत तीन जणांना आपला प्राण गमावावा लागल्याची घटना घडली होती. आता पुन्हा नाशिकच्या चांदवड घाटात बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाले आहे, मात्र आग का लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.