loader image
[ays_poll id=7]

ॲड.कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड

Jan 19, 2023

उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या न्यायिक सेवा परिक्षेच्या निकालात ॲड.कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश-१ सयाजीराव कोऱ्हाळे यांच्या त्या कन्या आहेत.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदाच्या परिक्षेतील ६३ उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची निवड झाली आहे. त्यांचे शालेय प्राथमिक शिक्षण न्यायडोंगरी, श्रीरामपूर, जळगाव येथे झाले असून इचलकरंजी येथील इचलकरंजी हायस्कूल (राजवाडा) येथील मराठी शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. तर संभाजीनगर येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय येथे विधी शिक्षण पूर्ण झाले आहे. पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कॉर्पोरेट लॉ मध्ये पदव्युत्तर (एल.एल.एम.) कायदा पदवी संपादन केली आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसायास सुरुवात केली. त्यांचे वडिल व पुणे येथील विधिज्ञ गणेश शिरसाट यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांचे बंधू हे देखील विधी पदव्युत्तर असून नाशिक येथे जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसायात आहेत. त्यांच्या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.