loader image
[ays_poll id=7]

एशोआरामाचे जीवन झुगारत आठ वर्षीय मुलीने घेतली दीक्षा

Jan 20, 2023

हिरे व्यापाऱ्याच्या आठ वर्षीय मुलीने ऐशोआरामाचे आयुष्य झुगारून साध्वी होण्याचा मार्ग निवडला आहे. गुजरातच्या सुरतमधील हिरे व्यापारी कुटुंबातील देवांशी संघवी या आठ वर्षीय मुलीने सर्व सुखसोयींचा त्याग करून जैन साध्वी म्हणून दीक्षा घेतली. बुधवारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला 35 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. अनेक संत-मुनींच्या उपस्थितीत आचार्य कीर्तियश सुरीश्वर महाराज यांच्या हस्ते देवांशी हिने जैन साध्वी म्हणून दीक्षा घेत संन्यास मार्गाच्या जीवन प्रवासाला सुरुवात केली आहे. देवांशीच्या दीक्षा महोत्सवासाठी घोडे, हत्ती, उंट यांच्या उपस्थिती मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
चिमुकल्या देवांशीच्या दीक्षा महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. हिरे व्यापाऱ्याच्या मुलीने एवढ्या कमी वयात साध्वी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवांशी साध्वी झाल्यानंतर तिला निरोप देताना तिचे कुटुंबीय अतिशय भावूक झाले होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.