loader image
[ays_poll id=7]

ज्युनियर एम.पी.एल. क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता आय.बी.एम. स्टार्स संघ उपविजेता एस.ए.चॅलेंजर संघ

Jan 21, 2023


मनमाड :- आर.डी.पी.युवा मंच व मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे ज्युनियर एम.पी.एल.क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आय.बी.एम.स्टार्स विरुद्ध एस.ए.चॅलेंजर संघामध्ये झाला.आय.बी.एम.स्टार्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना मर्यादित 6 षटकात 4 गडी बाद 76 धावा केल्या.प्रत्युत्तर एस.ए.चॅलेंजर संघ 6 षटकात 3 गडी बाद 72 धावा करू शकला. हा सामना आय.बी.स्टार्स संघाने 4 धावाने जिंकून प्रथम पारितोषिक रु.15000/- व चषकाचा मानकरी ठरला.द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रु.11000/- व चषक एस.ए.चॅलेंजर संघ,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व चषक जयकुमार फायटर संघ तसेच चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक व चषक सुपर स्टार संघास देण्यात आले. तसेच मालिकविर पुरस्कार निखिल चुनियान, उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार सरफराज (सोनू) शेख,उत्कृष्ट झेल पुरस्कार रितेश पगारे,बिग सिक्स पुरस्कार सिकंदर मोगल,उत्कृष्ट युवा खेळाडू पुरस्कार मनवीर सोनवणे या खेळाडूंना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित
राजाभाऊ पगारे (मा.नगराध्यक्ष,म.न.मनमाड),डॉ.रवींद्र राजपूत,डॉ. सुनील बिडगर,डॉ.नितीन जैन, हबिबभाई शेख, इरफानभाई मोमीन,सनीभाऊ अरोरा,सलमान अत्तार,सनी पाटील,बौद्धचार्य सुरेश आहिरे,हिरामन मनोहर (पत्रकार),सतीश परदेशी(पत्रकार), मन्सूफ शाह, राहुल साबळे यांच्या हस्ते सर्व पुरस्कार देण्यात आले.

मनमाड शहरातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम सामना पाहण्याचा आनंद लुटला.या स्पर्धेतून मनमाड शहरातील युवा क्रिकेट खेळाडू चमकले. स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पंधरा हजार रुपये मनमाड क्रिकेट समिती तर्फे,द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अकरा हजार रुपये,हबिबभाई शेख यांच्या तर्फे,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सात हजार रुपये सलमानभाई अत्तार यांच्या तर्फे व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पाच हजार रुपये मोहसीनभाई पठाण व पवन भाऊ रॉय यांच्या तर्फे देण्यात आले.तसेच उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार,बिग सिक्सर पुरस्कार,उत्कृष्ट युवा क्रिकेट खेळाडू पुरस्कार अक्षय जाधव यांच्या तर्फे देण्यात आले.

आय.बी.एम.स्टार्स,एस.ए.चॅलेंजर,जयकुमार फायटर,सुपर स्टार,एस.एस.सुल्तान, व्ही.एस.ग्रुप या सहा संघांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व संघ मालकांचे आर.डी.पी.युवा मंच व मनमाड क्रिकेट समिती तर्फे आभार मानण्यात आले. पंचाचे काम खलील कुरेशी,रहीम पठाण, ऑनलाईन स्कोररचे काम रुद्र पाटेकर,रोहित पवार,ओमकार ठोंबरे,सचिन गरुड व समालोचन मनोज ठोंबरे (सर),अक्षय जाधव,सिद्धार्थ (भोला) रोकडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर व भूमी क्रिकेट अकॅडमी,मनमाड संचालक सिद्धार्थ (भोला) रोकडे यांनी उत्कृष्ट केले.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.