loader image
[ays_poll id=7]

मनोज ठोंबरे सर यांची राज्यस्तरीय क्रीडारत्न जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

Jan 21, 2023


मनमाड :- तेजस फाऊंडेशन,नाशिक तर्फे क्रीडाक्षेत्रात उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष तथा न्यू इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगरसुल ता.येवला चे उपशिक्षक मनोज ठोंबरे सर यांची राज्यस्तरीय क्रीडारत्न जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.सदर पुरस्कार दि. 30/1/2023 रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र,औरंगाबाद येथे प्रदान करण्यात येणार आहे.
एम.पी.एल.क्रिकेट अध्यक्ष राजाभाऊ जाधव,उपाध्यक्ष रहीम पठाण,मनमाड क्रिकेट समितीचे सचिव जाविद शेख सर,कार्यवाहक देवेंद्र चुनियान,एस.ए.चॅलेंजर क्रिकेट संघाचे संघमालक सनीभाऊ अरोरा,मन्सूफ शाह एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड,आय.बी.एम.स्टार्स क्रिकेट संघाचे संघ मालक इरफान भाई मोमीन,जयकुमार फायटर संघाचे संघमालक जयकुमार फुलवाणी, के.जी.एन. क्रिकेट स्पर्धा,मनमाड अध्यक्ष मोहसीन पठाण,मनमाड शहराचे उत्कृष्ट माजी क्रिकेट खेळाडू हबिबभाई शेख यांनी मनोज ठोंबरे सरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.