तूळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
वृश्चिक : वस्तू गहाळ होऊ नयेत याची दक्षता घ्यावी. कामे रखडण्याची शक्यता.
धनू : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी उत्तम स्थिती असेल.
मकर : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. मानसन्मान वाढेल.
मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आर्थिक लाभ होतील.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत, उत्तम स्थिती राहील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. . प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
मीन : आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.
कन्या : भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.











