loader image
[ays_poll id=7]

कोपरगाव येथील अंडर 14 क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमीच्या संघाचा फायनल मध्ये प्रवेश – अद्वैत पारिख ठरला सामनावीर

Jan 24, 2023


बुधवार दि. 23 जानेवारी रोजी साई सिटी कोपरगाव येथे साईकृपा क्रिकेट अकॅडमी आयोजीत साईकृपा अंडर 14 चॅम्पियनशिप 2023 मध्ये भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द शिर्डी क्रिकेट अकॅडमी अंडर 14 या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने सात गडी राखत एकतर्फी सहज विजय प्राप्त केला. २० षटकांच्या या सामन्यामध्ये शिर्डी संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. शिर्डी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत मध्ये ५ बळी गमवुन ११७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत असताना अद्वैत पारिख याने ४७ धावांची खेळी (६ चौकार , १षटकार ) केली तसेच रुषी शर्मा १७ धावा , हसन शेख १७ नाबाद धावा करत १८.५ षटकात हा सामना ३ फलंदाज गमवुन सहजरित्या जिंकला. सामण्यात सर्वाधिक धावा करणारा मनमाड संघाचा अद्वैत पारिख हा सामणावीर ठरला. हा सामना जिंकुन मनमाड संघाने यास्पर्धेतील अंतिम सामण्यासाठी प्रवेश केला. मनमाड संघाचा अंतिम सामना पी.सी.ए. ज्युनिअर्स सोबत 24 जानेवारी रोजी कोपरगाव येथे खेळवण्यात येईल.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ रोकडे यांचे मार्गदर्शन या खेळाडुंना लाभले.
भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ मा. श्री. ईरफानभाई मोमीन, राजाभाऊ पगारे , गणेशभाऊ धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , तय्यबभाई शेख , परवेज शेख , कौशल शर्मा , शुभम गायकवाड , शुभम बिडगर व रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ इरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.