Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचे विधानभवनात समारंभपूर्वक अनावरण

Jan 24, 2023

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात प्रस्थापित करण्यात आलेल्या त्यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा काल उत्साहात संपन्न झाला. यावेळी जमलेल्या सर्व मान्यवरांनी बाळासाहेबांच्या ह्रद्य आठवणींना उजाळा दिला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य व्यक्ती विधानसभेची पायरी चढू शकल्या हे केवळ त्यांच्यामुळेच शक्य झाले असे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. राज्यातील सत्ता जी मोजक्या घराण्यांमध्ये एकवटली होती ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे श्रेय फक्त बाळासाहेबांनाच जाते. त्यांच्या विचारांमुळे असंख्य तरुणांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले. जातीपातीचा विचार कधीही न करता किंवा मतांची गणिते न आखता त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे कसे उभे राहायचे हे बाळासाहेबांकडून शिकण्यासारखे होते.

आज त्यांचे तैलचित्र विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात लागते आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे. आज जर धर्मवीर आनंद दिघे असते तर त्यांचादेखील ऊर अभिमानाने भरून आला असता असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार गजानन कीर्तीकर, माजी मंत्री रामदास कदम, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे, युती सरकारमधील इतर सर्व मंत्री, विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्व सन्माननीय सदस्य, विविध देशांचे राजदूत, वृत्तपत्रांचे संपादक,आणि विविध पक्षांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी  विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

    मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]