loader image
[ays_poll id=7]

ई डी चे अधिकारी असल्याचे सांगून मुंबईतील झवेरी बाजारातील व्यापाऱ्याची पावणे दोन कोटींची लूट

Jan 24, 2023


मुंबईच्या झवेरी बाजारात ई डी चे अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याला तब्बल पावणे दोन कोटी रुपयाचा गंडा घालण्यात आल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली. ‘स्पेशल २६’ ह्या चित्रपटात दाखविल्या प्रमाणे तसाच प्रकार इथे घडला आहे. या सिनेमात खोटे अधिकारी बनून लूट करण्यात आली होती. अशाच पद्धतीने झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून करोडोंची लूट केली. पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ४ अज्ञात लोकांनी खोटा छापा टाकला. यावेळी त्यांनी स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. इतकंच नाहीतर आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यानंतर आरोपींनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.