स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर योजनेअंतर्गत गेल्या दीड दोन वर्षांपासून आपण काम करीत आहोत या योजनेअंतर्गत घराघरातून निघणारे वापरलेले प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिक पिशव्या वेस्टने प्लास्टिक कागदाचे तुकडे किंवा प्लास्टिकच्या बारीक बारीक वस्तू या कचऱ्यात न टाकता वेगळ्या जमा करून पुनर्वापरासाठी म्हणजेच त्यापासून नवीन प्लास्टिकच्या वस्तू बनविण्यासाठी वापर केला जाईल असा प्रयत्न असतो. या योजनेमुळे प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक कागदाचे तुकडे हे इतरत्र न पसरता व त्याचा कचरा न होता आपले शहर पण स्वच्छ राहील असा प्रयत्न आहे .या योजनेअंतर्गत अशा प्लास्टिकच्या पिशव्या एका तारेच्या हुक मध्ये अडकवून ठेवल्यास त्यात जमा करायला सोप्या होतात अशा प्रकारच्या तार फाईल मध्ये प्लास्टिक पिशव्या जमा करून मनमाड येथील सौ. रेखा राजेश पाटील या नियमितपणे प्लास्टिक पुनर्वापरासाठी जमा करीत असतात. आपणही अशा प्रकारे प्लास्टिक वेगळे जमा करून पर्यावरण मित्र म्हणून काम करू शकतात. आपणा सर्वांना नम्र विनंती. वाया जाणाऱ्या प्लास्टिकच्या स्वच्छ पिशव्या किंवा प्लास्टिकचे तुकडे कचऱ्यात न टाकता वेगळ्या जमा करा व आम्हाला कॉल करा आम्ही त्या घेऊन जाऊ किंवा पल्लवी मंगल कार्यालयात आपण जमा करू शकता. संपर्क, ९४२२२४८८३० विकास काकडे, दत्त मंदिर रोड ,पल्लवी मंगल कार्यालय, मनमाड.
फलक रेखाटन 1 मे 2025 महाराष्ट्र दिन व कामगार दिन
1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे...








