loader image
[ays_poll id=7]

संभाजी नगर जिल्ह्यातील बिडकीन येथील ५६ व्या निरंकारी वार्षिक समागम सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Jan 29, 2023

५६ वा निरंकारी वार्षिक संत समागम सोहळा यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवत निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी संवाद साधला.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. मानवजातीच्या कल्याणासाठी ते सतत कार्यरत असतात. निरांकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी काढले.

कोरोना कालखंडात निरंकारी मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कोरोना केंद्र उभारण्यात आली. महाड चिपळूण येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराच्या वेळीही निरंकारी मिशनचे कार्यकर्ते मंडळी अखंड सेवेत अग्रेसर होते. ठाणे मतदारसंघात देखील निरंकारी मिशनचे साधक अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवताना दिसतात त्यातही मी कायम सहभागी होत असतो असेही यावेळी बोलताना सांगितले. तसेच २६ जानेवारी रोजी अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दलही निरांकरी मिशनचे कौतुक केले.

याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगेंद्रसिंह जुनेजा, संत निरंकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि देश प्रदेशातून आलेले ३ लाखांहून अधिक साधक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.