loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर पोलिस ठाण्यात सक्षम अधिकारी नेमण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी

Jan 30, 2023

जिल्ह्यात संवेदनशील असलेल्या मनमाड शहरात सध्या सक्षम पोलीस अधिकारी नसल्याने गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराचा चार्ज प्रभारीवर असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसल्याचा आरोप करत सक्षम पोलीस निरीक्षक नेमावा या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. लवकरच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

मनमाड पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनमाड हे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आणि चार तालुक्याचे प्रवेशद्वार असून अतिशय संवेदनशील शहर आहे. एफसीआय, इंधन कंपन्या, रेल्वे कारखाना, उपजिल्हा रुग्णालय, जंक्शन रेल्वे स्थानक असल्याने शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दुचाकी चोरी, चैन स्नाचींग, छेडछाड, लुटमार तसेच खुनासारखे गंभीर गुन्हे होतात. काही वर्षांपूर्वी बाहेरगावच्या टोळक्याने गैंगवार करुन एकाचा खून केला होता. काही महिन्यापूर्वी एका आदिवासी लहान बालकाचा खुन झाल्याचे उघडकीस आले होते. आजपर्यंत शेकडो मोटारसायकल चोरी गेल्या आहेत. दररोज मोटारसायकली चोरीला जात आहे. त्याचा तपास लागलेला नाही. दीड लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या या शहरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांना व गुन्हेगारांना नियंत्रित करण्याचे काम शहर पोलीस ठाण्याचे आहे. मात्र येथे सक्षम अधिकारी नसल्याने गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे पोलीस प्रशासनाला अशक्य झाले आहे. मागील दोन तीन वर्षांपासून पोलीस निरिक्षक पद रिक्त आहे. प्रभारीकडे चार्ज आहे. सक्षम अधिकारी नसल्याने पोलीस प्रशासन निष्क्रिय झाले आहे. १२० असलेली पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या घटून ४० वर आली आहे. कमी पोलीस संख्या वाढत्या गुन्हेगारीचे एक महत्त्वाचे कारण असून नागरिकांच्या तक्रारी दाखल केल्या जात नसल्याच्या तक्रारी शिवसेनेकडे येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सक्षम अधिकारी असलेला पोलीस निरीक्षक नेमण्यात यावा अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, शहरप्रमुख माधव शेलार, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, अल्ताफ खान, जिल्हा समन्वयक सुनिल पाटील, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, विधानसभा संघटक संतोष जगताप यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.