loader image
[ays_poll id=7]

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जळगावात आयोजन विविध क्रीडा प्रकारात एक हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार

Jan 31, 2023

नाशिक, दि. 31 जानेवारी 2023 : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 2 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व 16 परिमंडलांतील 1 हजार 83 अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात 353 महिला तर 730 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे.

महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 2022-23 या वर्षाकरिता या स्पर्धेचे यजमानपद जळगाव परिमंडलाकडे आहे. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी ( दि.2 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय ‍सिंघल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (वित्त) रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प/मानव संसाधन) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) तथा कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रमोद शेवाळे, कार्यकारी संचालक (‍वित्त व लेखा) स्वाती व्यवहारे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण रविवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 4 वाजता एकलव्य क्रीडा संकुलावरच सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन) संजय ताकसांडे राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (वित्त) रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प/मानव संसाधन) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) तथा कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रमोद शेवाळे, कार्यकारी संचालक (‍वित्त व लेखा) स्वाती व्यवहारे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे, स्पर्धेचे मुख्य समन्व्यक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.