Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

Feb 6, 2023

केंद्र सरकारने व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत ॲप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. ‘तातडी’ आणि ‘आणीबाणी’ स्थिती म्हणून निर्णय घेत 138 सट्टेबाजी ॲप्स आणि 94 कर्ज देणारे ॲप्स चिनी लिंक्सवर बंदी घालण्याची आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गृह मंत्रालयाने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेतल्याचे समजते. मंत्रालयाने केलेल्या चौकशीत हे ॲप्स IT कायदा कलम 69 ला ( IT Act Section 69 ) चे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले. कायद्यानुसार सर्व पुष्टी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. बंदी घालण्यात आलेली सर्व ॲप्स ही भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा आणणारी सामग्री असल्याचे सरकारने म्हटले आहे.
सरकारने केलेली कारवाई ही विविध संस्था, व्यक्ती यांच्या द्वारे मोबाईल ॲप्सद्वारे अल्प अथवा दिर्घ काळासाठी घेतलेल्या कर्जासाठी लोकांकडे खंडणी मागणे, त्यांचा छळ करणे, अशा विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. हे ॲप्स भारतीयांना कामावर घेऊन त्यांना संचालक बनवणाऱ्या चिनी नागरिकांच्याच विचारांची उपज असल्याचे पुढे येत असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहिती असी की, हे ॲप्स हताश व्यक्तींना कर्ज घेण्याचे आमिष देते. त्यांना कर्जवितरण करते आणि नंतर त्यांचे व्याज वार्षिक 3,000 टक्क्यांपर्यंत वाढवले नेते. कर्जदाराची कर्ज फेडण्याची ऐपत नसताना कर्ज वसूल करण्यासाठी या ॲप्सचे प्रतिनिधी कर्जदाराला प्रचंड मानसिक त्रास देत त्यांच्याकडून खंडणी उकळणे, स्थानिक गुंडांची मदत घेऊन धमकावणे, असेही प्रकार काही प्रकरणांमध्ये पुढे आले आहेत.

धक्कादायक म्हणजे, जे कर्जदार खास करुन महिला कर्जदार जर कर्ज फेडण्यास असमर्थ असतील तर त्यांना अश्लिल फोटो पाठवणे, त्यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियात पोस्ट करण्याची धमकी देणे. त्यांच्याशी संबंधीत लोकांना फोनवरुन शिवीगाळ करणे असे प्रकारही केले जात असत. या ॲप्सच्या प्रतिनिधींच्या छळाला कंटाळून काहींनी आत्महत्या केल्याचीही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणा, ओडिशा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी या अॅप्सवर कारवाई करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितले होते, असे सूत्रांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-form][contact-field label="Name" type="name" required="true" /][contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]