loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आदित्य ठाकरे

Feb 8, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हे घटनाबाह्य सरकार असुन येत्या दोन तीन महिन्यात कोसळणार आहे .  आमच्या राज्यातून सहा उद्योग बाहेर गेले आहे. राज्याचे जी एस टी चे पैसे का मिळत नाही?  मुख्यमंत्री दिल्लीला स्वतःसाठी जातात त्यांना स्वतःचे काय होईल याची चिंता आहे.   राज्यासाठी केंद्राकडून काहीच आणत नाही. हे मुख्यमंत्री आपले आहे की गुजरातचे आहे हेच कळत नाही  कारण सर्वच प्रकल्प गुजरात ला जात आहे. यामुळे राज्यातील एक लाख तरुणांच्या नोकऱ्या बाहेर गेल्या आहेत.
असल्याचा आरोप शिवसेनानेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसंवाद यात्रा निमित्ताने नांदगाव येथील जैन धर्म शाळेत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते..

यावेळीआमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,अद्वय हिरे .जयंत दिंडे, अल्ताफ खान, शिवसेना तालुका संतोष गुप्ता, पिंटू नाईक, संतोष बळीद शशिकांत मोरे, शहराध्यक्ष श्रावण आढाव आदी मान्यवर उपस्थित होते..
शिवसेना नेते व माजी मंत्री  आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, सरकार हे घटनाबाह्य सरकार असुन येत्या दोन तीन महिन्यात कोसळणार आहे .  आमच्या राज्यातून सहा उद्योग बाहेर गेले आहे. राज्याचे जी एस टी चे पैसे का मिळत नाही?  मुख्यमंत्री दिल्लीला स्वतःसाठी जातात त्यांना स्वतःचे काय होईल याची चिंता आहे.   राज्यासाठी केंद्राकडून काहीच आणत नाही. हे मुख्यमंत्री आपले आहे की गुजरातचे आहे हेच कळत नाही  कारण सर्वच प्रकल्प गुजराल जात आहे. यामुळे राज्यातील एक लाख तरुणांच्या नोकऱ्या बाहेर गेल्या आहेत.तसेच आज मी राज्यात जिथे फिरत आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन जनता आम्हाला प्रतिसाद देत आहे. मात्र गद्दार जिथे जातात तिथे जनता त्यांना उभे करत नाही. आजच्या सभेला महिलासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात दिसून येत आहे . शिवसेना एकच असून एकच राहणार आहे. संपूर्ण राज्य महाविकास आघाडीसोबत उभे आहे. ज्यांनी गद्दारी केली ते जनतेला पटलेले नाही. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेची जी सेवा केली, त्यामुळे देशभरात महाराष्ट्राचे नाव अग्रस्थानी राहिले. खोकेवाल्यांच्या सभा बघा व आमच्या सभा बघा. आमच्या सभेला जनता स्वतःहून येते व आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगतात.. पारंपरिक मतदार शिवसेनेसोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 
यावेळी अल्ताफ खान, अव्दय हिरे
गणेश धात्रक यांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळीआमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,जयंत दिंडे, अल्ताफ खान, शिवसेना तालुका संतोष गुप्ता, पिंटू नाईक, संतोष बळीद शशिकांत मोरे, शहराध्यक्ष श्रावण आढाव आदी मान्यवर उपस्थित होते..


अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.