loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी

Feb 10, 2023

मनमाड शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष योगेश ( बबलू ) पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्याकडे त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मनमाड नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर याचा कितपत परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान पाटील यापुढे कोणता राजकीय निर्णय घेतील या संबंधी वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात असले तरी त्यांची व नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची वाढलेली जवळीक बघता पाटील हे सोमवारी मनमाड येथे होणाऱ्या करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाच्या दिवशी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षातून अजून कोण कोण राजीनामा देऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतो हे आता सोमवारीच कळेल.

मनमाडचे माजी नगराध्यक्ष दिलीप पाटील यांचे ते चिरंजीव तर राष्ट्रवादीचे नगर पालिका गटनेते कैलास पाटील यांचे ते पुतणे आहेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.