loader image
[ays_poll id=7]

मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते करंजवन योजनेचे सोमवारी उद्घाटन – मनमाडला जय्यत तयारी

Feb 12, 2023

मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मनमाड नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोमवारी (ता. १३) मनमाड दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. मनमाडसाठी जीवनदायी असलेल्या करंजवन जलवाहिनी योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी महर्षी वाल्मीकी मैदानावर सभामंडप उभारण्यात येत आहे. आमदार सुहास कांदे यांच्यासह अंजूम कांदे, फरहान खान तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये व्यस्त आहेत. शिंदे-फडणवीस युती सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा मनमाड दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तानाजी सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, बाळासाहेबांची शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिस प्रशासनाकडून देखील बंदोबस्ताची तयारी केली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
.